आदी आदिम आदिवासी
आदिवासी.... आखिल विश्वात दुर्गम भागात एकच जमाती नांदते ती म्हणजे आदिवासी. मी एक आदिवासी च बोलतोय.हिमयुग अशमयुग मी जवळून पहिले अनुभवले, मुळातच मी निसर्गप्रेमी असल्याने निसर्गाच्या या अवस्था मी आत्मीयतेने जगलो , यामुळेच जबरदस्त सहनशीलता हा गुण माझ्यात आला आणि पुढचं जगणे सुकर झाले. आजच्या प्रगत आधुनिक मानवाच्या मुळाशी मीच आहे, आजचा विकसित मनुष्य जाणीव पूर्वक ही गोष्ट विसरू पाहत आहे. ही एक दुःखादायक सल मनाला बोचते नेहमीच. माझा संपन्न वारसा परंपरा या फक्त माझ्या पुरत्याच सीमित आहेत का, बारमाही वाहणाऱ्या नद्या घनदाट वनराई मिरवणारे डोंगर दऱ्या हा माझा नैसर्गिक अधिवास विलुप्त होण्याच्या मार्गांवर आहे. ज्या निसर्गाच्या कुशीत माझं संगोपन झालं विस्तार झाला त्या निसर्गाला ओरबसूनच आजचा मानव प्रगती करतो आहे, यालाच प्रगती म्हणायची का, कुऱ्हाडी चा दांडा गोतास काळ ही म्हण सार्थ केली आजच्या आधुनिक मानवाने. लाज लज्जा शरम खुन्टीला टांगून ठेवली आहे. ज्या निसर्गाच्या कृपेनें मनुष्य येथवर पोहोचला आज त्याच निसर्गाच्या मुळाशी घाव घातला जातोय. लक्षावधी वर्षे या पृथी तलावर राज्य करणारे डायनासोर सुद्धा इतके ...