आदी आदिम आदिवासी

 आदिवासी.... आखिल विश्वात दुर्गम भागात एकच जमाती नांदते ती म्हणजे आदिवासी. मी एक आदिवासी च बोलतोय.हिमयुग अशमयुग मी जवळून पहिले अनुभवले, मुळातच मी निसर्गप्रेमी असल्याने निसर्गाच्या या अवस्था मी आत्मीयतेने जगलो , यामुळेच जबरदस्त सहनशीलता हा गुण माझ्यात आला आणि पुढचं जगणे सुकर झाले. आजच्या प्रगत आधुनिक मानवाच्या मुळाशी मीच आहे, आजचा विकसित मनुष्य जाणीव पूर्वक ही गोष्ट विसरू पाहत आहे. ही एक दुःखादायक सल मनाला बोचते नेहमीच. माझा संपन्न वारसा परंपरा या फक्त माझ्या पुरत्याच सीमित आहेत का, बारमाही वाहणाऱ्या नद्या घनदाट वनराई मिरवणारे डोंगर दऱ्या हा माझा नैसर्गिक अधिवास विलुप्त होण्याच्या मार्गांवर आहे. ज्या निसर्गाच्या कुशीत माझं संगोपन झालं विस्तार झाला त्या निसर्गाला ओरबसूनच आजचा मानव प्रगती करतो आहे, यालाच प्रगती म्हणायची का, कुऱ्हाडी चा दांडा गोतास काळ ही म्हण सार्थ केली आजच्या आधुनिक मानवाने. लाज लज्जा शरम खुन्टीला टांगून ठेवली आहे. ज्या निसर्गाच्या कृपेनें मनुष्य येथवर पोहोचला आज त्याच निसर्गाच्या मुळाशी घाव घातला जातोय. लक्षावधी वर्षे या पृथी तलावर राज्य करणारे डायनासोर सुद्धा इतके राक्षसी नव्हते. निसर्गाचा समतोल त्या प्रजातीने कधीच ढळू दिला नाही परिणामस्वरूप काही कोटी वर्षे आपले अस्तित्व त्यांनी कायम ठेवले... एक उल्कापिंड जर पृथ्वीला धडकला नास्ता तर आजही येथे दायानसोर च असते. आजच्या मानवाने या प्रसंगातून धडा घेतला पाहिजे. निसर्गाचा असमतोल मानवाच्या अस्तित्वाला च सुरुंग लावू शकतो  बोडके होत जाणारे डोंगर पावसाळ्यात च वाहणाऱ्या नद्या ही लक्षाने चांगली नाहीत. विनाशकाले विपरीत बुद्धी. भयानक विनाश हा एकच निष्कर्ष यातून निष्पन्न होतो. आजच्या मानवाची राक्षसी महत्वाकांक्षा उद्याच्या विनशाला जबाबदार असणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. नेमके काय साध्य आणि सिद्ध करायचे आहे आजच्या मानवाला या प्रगती मधून खगोल संस्था नासा हे च सांगते कि हे ब्रम्हाण्ड अनंत आहे, पण ही गोष्ट माझ्या पूर्वजानी हजारो वर्षे आधीच सांगून ठेवली आहे. त्यात नवे काय आहे.  हर्बल टेलिस्कोप तेच पाहत आहे जे ऋषीं मुनींनी हजारो वर्षे आघी सांगितलं आहे. आधुनिक मानव चंद्रावर पोहोचला ही अभिमानास्पद गोष्ट आहे पण आदि मानवाने पिऱ्यामिड कसे बांधले असेल हे आजही कोडेच आहे . कोट घातला टाय बांधला चष्मा लावला केसांना रंग लावला म्हणजे आधुनिक असे समाजाचे का हीच आधुनिकतेची व्याख्या मानायची का आणि या व्यतिरिक्त सुद्धा उरतातच कि त्यांना काय समजायचं , सत्तावीस नक्षत्र आणि राशीं बारा असतात हे आदि्मानवला फार फार पूर्वी पासूनच माहिती आहे त्यात नवे ते काय , प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण यांची जन्म कुंडली मध्ये राशीं आणि नक्षत्र यांची स्थिती काय होती याला आजच्या प्रगत आधुनिक विज्ञानाने भक्कम दुजोरा दिला आहे तेव्हा हर्बल दुर्बीण नव्हती.... जे फार पूर्वी पासून माहिती आहे ते नव्याने सिद्ध करण्यात कोणता पुरुषार्थ आहे ते त्यांनाच माहिती. सोमनाथ मंदिराच्या कळशावरून हेच समजते कि आदि मानवाला दक्षिण ध्रुव माहित होता.... आजचा प्रगत मानव तेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय जे आदि मानवाने फार फार वर्षा पूर्वी अधोरेखित करून ठेवले आहे. क्रमश...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारताला स्वातंत्र्य कोणामुळे

इतिहासकार आणि मुघल

विकृत दळभद्री पाठ्यपुस्तक कार