एक भयानक वास्तव
1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील कालिकत बंदराजवळील एका छोट्या खेड्यात आला . त्याने स्थानिक राजा श्री सामूरी त्यांच्याकडे कालिकत बंदरात वखार उभारण्याची परवानगी मिळवली आणि व्यापार सुरू केला , त्यानंतर दोन वर्षांनी कोचीन बंदरात देखील वखार सुरू करून व्यापाराची परवानगी मिळवली , या दोन वर्षात दरम्यान वास्को-द-गामाने अरबी आणि इराणी व्यापाऱ्यांना हाकलून देऊन स्वतःची मक्तेदारी निर्माण केली , याच दरम्यान गामा आणि त्याच्या सहकाऱ्यांना भारतातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात आली होती,
येथील राज्यकर्त्यांमध्ये आपापसात शत्रुत्व आणि एक जुटीचा अभाव होता , स्थिर झाल्यानंतर गामा ने सामूरी राजाच्या सैन्याला कोचीन आणि कालिकत बंदरामधून हाकलून लावले आणि स्वतः कोचिंग बंदरात किल्ला बांधला तोपर्यंत पोर्तुगाल राजा कडून वास्को द गामा याच्या मदतीसाठी आरमारी सैन्य पाठवले होते.
पोर्तुगीज राजाचा प्रतिनिधी फ्रँसीस द आलमेयदा हा 1503 मध्ये सैन्या आणि आरमार घेऊन पहिला व्हाईसरॉय म्हणून भारतात आला , यादरम्यान पोर्तुगीज सैन्याने भारतातील किलवा अंजदीव कोचीन कंनोर या बंदरामध्ये किल्ले बांधून पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्ता स्थापन केली .
पोर्तुगीजांनी ठिकठिकाणी बांधलेल्या किल्ल्यांमुळे पोर्तुगीज सेनेचा आरमारी परवाना घेतल्याशिवाय भारतीय गलबताना बाहेर जाणे मुश्किल होते .
1508 मध्ये पोर्तुगीज राजाने आपला विश्वासू सहकारी अफाणसो अल्बकूर्क याला सैन्यासोबत भारतात पाठवले , अल्बकूर्क हा पोर्तुगीज सत्तेचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल होता , 1510 मध्ये अल्बकूर्क ने गोवा जिंकून घेतले, इथपर्यंत सर्व ठीक होते , पण इथून पुढे सुरू झाला पोर्तुगीज सत्तेचा नंगा नाच ...
प्रबळ मध्यवर्ती सत्तेच्या कमतरतेमुळे पोर्तुगीज शेफारून गेले होते . भारतीय जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली , पोर्तुगीज हे राक्षसी नराधम वृत्तीचे होते , गरीब जनतेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना गुलाम म्हणून युरोपात देण्यात येत असे , मसाल्यांच्या व्यापारापेक्षा गुलामांच्या व्यापारात वास्को-द-गामाने अधिक रस दाखवला होता आया बहिणींची अब्रू वेशीवर टांगली , जबरदस्तीने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडले , अनेक जुलमी आणि राक्षसी कायदे लागू केले, हिंदू मंदिरे तोडून चर्च बांधण्यात आले,
भारताच्या पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांची सत्ता असल्यामुळे पोर्तुगीज मराठ्यांच्या विरोधात होते , मराठ्यांच्या वाढत्या सत्तेला आळा घालण्यासाठी आदिलशाही आणि निजामशाही ला गुप्तपणे मदत पुरवली जात होती , इसवीसन 1666 मध्ये शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला ला वेढा घातला यामुळे खवळलेल्या पोर्तुगीजांनी मराठा आरामाराची रसद बंद केली होती पण शिवाजी महाराजांनी 1675 मध्ये फोंडा किल्ला जिंकला आणि कान्होजी आंग्रेना आरमार प्रमुख बनवले , आंग्रे यांनी पोर्तुगीजांना मोठी जरब बसवली .
शिवाजी महाराजा नंतर संभाजी महाराजांच्या काळात पोर्तुगीजांनी मोगलाना कायम सहाय्य केले , पोर्तुगीजांनी 1684 च्या मध्यात मोगलांच्या साह्याने फोंडा किल्ला पुन्हा वेदा घातला पण स्वतः संभाजी महाराज चालून गेले आणि पोर्तुगीजांची दानादान उडवली , कान्होजी आंग्रेंची समुद्रावरील मक्तेदारी विरोधात पोर्तुगीज आणि इंग्रज एकत्र आले होते.
पश्चिम किनारपट्टी व्यतिरिक्त पोर्तुगीजांचा राज्यस्तर फारसा झाला नाही , 1541 मध्ये पोर्तुगलचा राजा तिसरा दो जुआऊ याच्या डोक्यात धर्मप्रसाराचे खूळ भरले त्यामुळे त्याने भारतात सेंट फ्रान्सिस झेव्हीअर ला गोव्याला पाठवले , सेंट फ्रान्सिसने अनेक गोमंतकीय कुटुंबीयांना जबरदस्तीने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडली,
संभाजी महाराजांनंतर पश्चिम किनारा पट्टीवर मराठ्यांची दहशत कमी झाली होती पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांपुढे पोर्तुगीजांचे काहीही चालले नाही भारताबरोबर अमेरिकेतही वसाहती वाढवण्याचा हव्यास पोर्तुगाल ला झेपला नाही परिणाम स्वरूप भारताबरोबर अमेरिकेतूनही पोर्तुगीजांना काढता पाय घ्यावा लागला.
क्रमश :
Real
ReplyDeleteIs this reality
ReplyDeleteजय हिंद
ReplyDeleteहे परकीय सगळे भिकारडे होते
ReplyDeleteअमानुष अत्याचार करणारे च होते
ReplyDelete