गरम मसाला ते वास्को द गामा

आठव्या शतकाच्या सुमारास अरबी राज्यकर्त्यांच्या नजरा हिंदुस्तान कडे होत्या. खास करून पहिल्यांदा मोहम्मद कासिम याने सिंध प्रांतावर ताबा मिळवला, त्यानंतर मोहम्मद घोरी त्याने अकराव्या  शतकाच्या उत्तरार्धात हिंदुस्तान वर अनेक आक्रमणे करून उत्तर पश्चिम हिंदुस्थानात स्वतःची सत्ता स्थापन केली, त्याला पार्श्वभूमी होती ती मोहम्मद गजनी याच्या हिंदुस्तान वर केलेल्या सतरा स्वाऱ्यांची, या सतरा स्वार्यांनी उत्तर हिंदुस्तान मधील राज्यसत्ता खिळाखील्या झाल्या होत्या कमकुवत झाल्या होत्या, याचाच फायदा मोहम्मद शहा घोरी ने घेतला होता. प्रारंभी त्याने अंमलदार नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने स्वतःला सुलतान म्हणून जाहीर केले आणि आपला राज्य विस्तार करून दिल्लीत एक स्थिर शासन स्थापन केले.

 अरबी देशांमध्ये व्यापार हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता, मजबूत आणि स्थिर सत्ता जनतेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात , कुतूबुद्दीन ऐबक च्या काळात हिंदुस्थानचे अरबी देशांसोबत व्यापार जोरात चालू होता , त्यामध्ये मुख्यतः मसाल्याचे पदार्थ होते,

 अरबी सुलतानांचा युरोपियन देशांसोबत पूर्वीपासूनच व्यापार चालत असे , हिंदुस्तानी मसाल्यांचे पदार्थ अरबी देशांमध्ये लोकप्रिय होते, आणि इथून च भारतीय मसाले युरोपियन देशांमध्ये पोहोचले. अल्पावधीतच युरोपियन देशांमध्ये हिंदुस्तानी मसाले पदार्थ अफाट लोकप्रिय झाले,

 हिंदुस्तानी मसाल्यांच्या निमित्ताने अरबी व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक कमाईचा खजिना च सापडला होता , त्यामुळे त्यांनी युरोपियन व्यापाऱ्यांना हे मसाले कुठे भेटतात, कोणत्या देशात भेटतात ही गोष्ट कधीच कळू दिली नाही , अर्थात युरोपियन व्यापारी देखील साम दाम दंड भेद यामध्ये पारंगत होते, त्यांनी ही माहिती मिळवलीच की हे मसाले पूर्वेकडील हिंदुस्तान नामक देशामध्ये मिळतात, परिणाम स्वरूप भारताचे नाव साता समुद्रापार पोहोचले. भारताबद्दल इतरही बरीच माहिती युरोपियन देशांनी मिळवली होती , त्यामध्ये प्रामुख्याने भारताची आर्थिक संपन्नता युरोपियन देशांच्या लक्षात आली होती, आणि इथूनच भारताचा शोध ही आक्रमणांकित प्राथमिकता युरोपात निर्माण झाली. या शोध मोहीम स्पर्धेत स्पेन आणि इटली हे युरोपियन देश आघाडीवर होते.

 मजबूत आणि प्रबळ आरमार , राजेशाही चा भक्कम पाठिंबा , कुशल आणि माहितगार दर्यावर्दी  स्पेन ने आघाडी घेतली होती. त्यातच तुर्की राजाने कोन्स्टानोपाल जिंकून घेतल्याने युरोपियन देशांचे आशिया खंडा मार्गे भारतासोबत व्यापार करण्याचा मार्ग बंद झाला होता आता फक्त सागरी मार्गाने  च भारतात पोहोचणे शक्य आहे याची पुरेपूर जाणीव युरोपियन देशांना झाली होती.

 आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला , दर्यावर्दी चे नाव होते ख्रिस्तोफर कोलंबस, हा एक इटालियन नाविक होता , ऑगस्ट  1492 मध्ये कोलंबस स्वतःच्या तीन जहाजांसह भारताच्या शोधात निघाला , दोन महिन्यांच्या समुद्र प्रवासानंतर ऑक्टोंबर  1492 मध्ये  तो एका भूभागावर पोहोचला तो भूभाग म्हणजे आजची अमेरिका , आपण शोधलेला भूभाग भारत नसून अमेरिका आहे हे कोलंबसच्या लक्षात शेवटपर्यंत आलेच नाही , स्पॅनिश राजेशाहीच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर कोलंबसला मात्र अटक झाली .

 स्पेन अपयशी झाल्यानंतर पोर्तुगाल ने पुढाकार घेतला , 15 व्या शतकात युरोपात पोर्तुगाल ही सर्वात मोठी सागरी शक्ती होती  कोलंबस पश्चिम मार्गाने भारताच्या शोधात निघाला होता , म्हणून पोर्तुगाल नाविकांनी उलट दिशेने म्हणजे पूर्वेला जायचे निश्चित केले , चार जहाजांचा ताफा आफ्रिकेच्या किनारपट्टी सोबत प्रवास करत होता  खूप दिवसानंतर हा ताफा दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप ला येऊन पोहोचला , या ताफ्यामध्ये वास्को द गामा याचा छोटा भाऊ बलतिमिर डियाज हा देखील होता , येथे आल्यानंतर त्यांना समजले की भारतात पोहोचायचे असेल तर हिंदी महासागर पार करावा लागेल , हतबल होऊन हा ताफा पुन्हा पोर्तुगाल मध्ये आला, छोट्या भावाकडून ही माहिती समजल्यानंतर वास्को द गामा ने भारतात जाण्याचा मनसुबा व्यक्त केला , पोर्तुगालच्या राजाने या मोहिमेला पाठबळ पुरवले , आणि मग चार जहाजे आणि 170 प्रशिक्षित खलाशी घेऊन ऑक्टोंबर 1497 मध्ये  वास्को-द-गामा भारताच्या शोध मोहिमेवर निघाला .

 तीन महिन्यात वास्को-द-गामा ने केप ऑफ गुड होप ला ओलांडून हिंद महासागरात प्रवेश केला, दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याने प्रवास करत असताना गामा एका बंदरात पोहोचला ते बंदर होते मोझांबिक, इथे त्याला काही भारतीय जहाजे भेटली , एका भारतीय जहाजावरील अब्दुल माझीद नावाच्या खलाशाचे मदत घेऊन वास्को द गामाने हिंदी महासागर ओलांडला , सात महिन्यांच्या प्रवासानंतर वास्को-द-गामा भारतीय समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला , कालिकत बंदरा पासून उत्तरेला 16 किलोमीटर एका छोट्याशा खेड्यात 17 मे 1498 ला त्याच्या जहाजांनी नांगर टाकला . या मोहिमेमुळे युरोपियन देशांना भारतात येण्याचा मार्ग सापडला....... क्रमशः 





Comments

  1. हा गामा नक्कीच भिकारडा होता वाटतय

    ReplyDelete
  2. सर्व परकीय भिकारडे दळभद्री होते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारताला स्वातंत्र्य कोणामुळे

इतिहासकार आणि मुघल

विकृत दळभद्री पाठ्यपुस्तक कार