भारताला स्वातंत्र्य कोणामुळे

 इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता एवढ्या मोठ्या साम्राज्याचे संस्थापक विस्तार करते इंग्रज काहीच कारण नसताना मोठ्या मनाने भारताला स्वातंत्र्य देऊन निघून गेले ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे अमेरिका फ्रान्स आणि रशिया यांच्या मदतीने ग्रेट ब्रिटन ने दुसरे जागतिक महायुद्ध जिंकले होते याचाच अर्थ इंग्रज तेव्हा यशाच्या शिखरावर होते , जागतिक महासत्ता म्हणून इंग्लंड ने त्यावेळी स्वतःची ओळख निर्माण केली होती, आणि एकाकी दोन वर्षातच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून ओळख असणाऱ्या भारताला त्यांनी स्वातंत्र्य दिले ही गोष्ट मनाला पटत नाही ,

 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा इंग्रज सैनिकांबरोबर भारतीय सैनिकांना ही दुसऱ्या महायुद्धात पाठवले गेले या गोष्टीला तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी कडाडून विरोध केला पण गांधीच्या मवाळ भूमिकेमुळे नेताजी आणि गांधी यांच्यात मतभेद निर्माण झाली परिणाम स्वरूप नेताजींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेस नेते आणि करमचंद गांधी  शांत बसले , कारण त्याकाळी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये  इंग्रजी सत्य ला कडाडून विरोध करणारे फक्त नेताजी होते आणि याच कारणास्तव नेताजींची  लोकप्रियता सर्वाधिक होती आणि हीच गोष्ट गांधीजी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांना पहावत नव्हती ,

 1942 मध्ये भारतीय जनतेच्या आग्रहामुळे गांधी आणि काँग्रेसने इंग्रजी सत्तेविरुद्ध  भारत छोडो आंदोलन केले पण ते आंदोलन इंग्रजांनी चिरडून टाकले गांधी आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले , साधारणता एक वर्षभर तुरुंगात राहिल्यामुळे सर्वच काँग्रेसचे शांत झाले होते , गांधी सहित वैतागलेल्या सर्वच काँग्रेस नेत्यांनी इंग्रजांना आश्वासन दिले की स्वातंत्र्य द्यायचे तेव्हा द्या तोपर्यंत काँग्रेस अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने  इंग्रजांना पाहिजे तेवढे सहकार्य करण्यास तयार आहे  भारत छोडो आंदोलन संपले

 त्यानंतर तीन वर्षे  सर्व काही शांत आणि सुरळीतपणे चालू असताना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणतेही आंदोलन केले नसताना अचानकपणे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य दिले . आणि आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाच्या लेखकांनी जाणून बुजून सोयीस्कर रित्या स्वातंत्र्य नेमके कसे मिळाले हे सांगण्याचे टाळले किंवा लपून ठेवले .

 भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे एकमेव कारण होते आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस , 1939 मध्ये काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नेताजी एकटे पडले होते आणि त्यादरम्यान इंग्रजी सत्तेने त्यांना नजर कैदेत ठेवले होते पण 1941 मध्ये नेताजी अफगाणिस्तान मार्गे मास्को आणि मास्को ते जर्मनीमध्ये जाऊन पोहोचले , जर्मनीमध्ये त्यांनी भारतीय युद्ध कैद्यांची जमवा जमव केली नंतर जर्मनीचे अध्यक्ष हिटलर यांची भेट घेतली पण हिटलर कडून काही मिळण्यासारखे नाही हे लक्षात आल्यानंतर पाणबुडीने ते जपानच्या ताब्यात असलेल्या सुमात्रा बेटावर पोहोचले तेथे त्यांनी जपानच्या ताब्यात असलेल्या भारतीय युद्ध कैद्यांच्या  मदतीने आझाद हिंद सेनेची स्थापना केली .

 अंदमान आणि निकोबार बेटावर नेताजींनी भारताचे अंतरिम सरकार स्थापन केले होते आणि एक पंतप्रधान म्हणून भारतीय राष्ट्रध्वजाला सलामी दिली होती त्यानंतर जपानच्या मदतीने त्यांनी जय हिंद आणि चलो दिल्ली या घोषणा देत इंग्रजी सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले ,

 त्याच दरम्यान अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी वर अनुभव टाकल्यानंतर जपानने शरणागती पत्करली आणि इकडे इंग्रज सरकारने आझाद हिंद सेनेच्या सैनिकांची धरपकड केली व त्यांना वेगवेगळ्या तुरुंगात टाकली आणि तिथेच इंग्रज सत्ता फसली.

 आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर वेगवेगळ्या तुरुंगात अमानुषपणे अत्याचार करण्यात येत होते आणि तेही ब्रिटिश सैनिकांच्या सोबत असलेल्या भारतीय सैनिकांसमोरच , आणि यामुळेच भारतीय जनतेसहित इंग्रजांच्या सेवेत असणाऱ्या भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला , अनेक ठिकाणी इंग्रजी सैनिक विरुद्ध भारतीय सैनिक यांच्यातच भांडणे व्हायला सुरुवात झाली आणि त्यात भर पडली ते नेताजींच्या विमान अपघाताची  त्या काळी इंग्रज सैनिक साधारणता 70 हजार होते आणि इंग्रजांच्या सेवेत भारतीय सैनिक साडेचार लाख होते आणि ह्याच साडेचार लाख प्रशिक्षित भारतीय सैनिकांनी आपल्याविरुद्ध बंद केले तर हिंदुस्तान मध्ये एकही इंग्रज जिवंत राहणार नाही याची कल्पना लॉर्ड माऊंटबॅटन यांनी इंग्लंडच्या पंतप्रधानांना दिली आणि हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन इंग्लंडच्या पार्लमेंटने ने भारतीय स्वातंत्र्याचा ठराव पास केला आणि सर्व इंग्रजांना आणि इंग्रजी सैनिकांना परत इंग्लंडला यायचा आदेश दिला .

 अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले.

 क्रमशः 



Comments

  1. आपल्याला ही वस्तुस्थिती का नाही सांगीतली

    ReplyDelete
  2. नेताजींच्या कार्यास विनंम्र अभिवादन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

इतिहासकार आणि मुघल

विकृत दळभद्री पाठ्यपुस्तक कार