इतिहासकार आणि मुघल

 मित्रांनो आपल्या शालेय पाठ्यपुस्तकला इतिहास म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्या पुरता च मर्यादित राहतो , प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक इतिहासाचे पाठ्यपुस्तके निर्माण करताना चे इतिहासकार एकतर मुगल खानदानातले असावेत किंवा तत्कालीन राज्यकर्ते तरी मुघल खानदानातले असावेत ,

 भारत वर्षाचा इतिहास हा अतिशय वैभवशाली आणि सामर्थ्यशाली असाच आहे , पण शालेय पाठ्यपुस्तकात आपल्याला फक्त इंग्रज आणि मुगल यांचा इतिहास शिकवला जातो कारण आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचे लेखक हे दळभद्री होते , गुप्त मौर्य चालुक्य  देवगिरी कलिंगा यासारखे प्राचीन भारताची अनेक वैभवशाली आणि सामर्थ्यशाली साम्राज्य होती , चंद्रगुप्त मौर्य पृथ्वीराज चव्हाण सम्राट अशोक शिवाजी महाराज यांचा इतिहास हा निश्चितच भारतीय जनतेसाठी स्फूर्तीदायक आहे. पण आपल्या शालेय पाठ्यपुस्तक इतिहासकारांना यांचा विसर पडलेला दिसतो , किंवा जाणीवपूर्वक त्यांनी ते तसे केलेले आहे , आपण गुलामगिरी मध्ये च चांगले जगतो हेच या इतिहासकारांना सिद्ध करावयाची दिसते ,

 स्फूर्तीदायक इतिहास शिकवण्याऐवजी आपले इतिहासकार आपल्याला गुलामगिरीने बरबटलेला इतिहास शिकवतात , भारतीयांना गुलामगिरीची सवय व्हावी एवढा एकच हेतू यांचा दिसतो , लोकमान्य टिळकांपर्यंत जहाल देशभक्तांनी भरलेली काँग्रेस मोहनदास करमचंद गांधीच्या काळात इंग्रजी सत्तेची गुलाम झाली होती फक्त नेताजी सुभाष चंद्र बोस याला अपवाद होते ,

 भारत वर्षांनी कायम गुलामगिरी मध्ये च रहावे असेच आपल्या इतिहासकारांना वाटते , सामर्थ्यशाली वैभवशाली तेजस्वी स्फूर्तीदायक इतिहास शिकवण्याऐवजी आपले इतिहासकार आपल्याला गुलामगिरीचा इतिहास शिकवतात , मराठा सत्तेने अटकेपार झेंडा फडकवला चा इतिहास आपल्याला एका ओळीत सांगतात पण पानिपतच्या युद्धात मराठी हरले यावर एक संपूर्ण पुस्तक लिहितात , आणि यात एक गंमत अशी की युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा अहमद शहा अब्दाली भारत सोडून पळून गेला होता का तर अजून मराठे आले तर आपला पराभव करतील ही भीती त्याला वाटत होती , ही वास्तविकता इतिहासाकारांनी आपल्यापासून लपवून ठेवली ,

 मला जग जिंकायचे आहे या महत्वाकांशेने अलेक्झांडर सुद्धा भारतावर चालून आला होता , हिंदुस्थानच्या सीमेवर त्याची लढाई छोटेसे राज्य असलेल्या पोरस राज्याशी झाली पण कमी सैन्य असणाऱ्या पोरस राजाने निकराची झुंज दिली होती, ती लढाई जिंकताना देखील अलेक्झांडरच्या तोंडाला फेस आला होता यानंतरचा सामना होता अतिशय बलशाली असलेल्या मगध साम्राज्याशी , त्याकाळी नंद परिवार मगध साम्राज्यावर शासन करत होता , अलेक्झांडरने आपले गुप्तहेर मगध साम्राज्यात  पाठवून माहिती मिळवली , जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर ला कळून चुकले की आपण मगध साम्राज्य बरोबर लढाई केली तर आपली समाधी इथेच बांधली जाईल आणि निराश होऊन तो मागे फिरला , आपले इतिहासकार आपल्याला हा इतिहास क्या्चितच सांगतात.

 भारतीयांची मानसिकता खच्ची करण्यामध्ये या इतिहासकारांचा मोलाचा वाटा आहे ,

 क्रमशः 



Comments

  1. आपले इतिहास संशोधक आपल्याला खरे का सांगत नाही

    ReplyDelete
  2. भारतीयांना असाच इतिहास माहिती व्हायला हवा

    ReplyDelete
  3. जगज्जेता अलेक्झांडर ला देखील स्वतः ची किव आली असेल

    ReplyDelete
    Replies
    1. आलेक्झाडर ला कळून चुकले होते कि आपली समाधी इथेच बांधली jael😂

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

भारताला स्वातंत्र्य कोणामुळे

विकृत दळभद्री पाठ्यपुस्तक कार