विकृत दळभद्री पाठ्यपुस्तक कार
मी इयत्ता चौथी मध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे मुखपृष्ठ असणारे इतिहासाचे पुस्तक पहिल्यांदा हातात पडले मला ते चित्र फार आवडायचे , वाटायचे चला आता इथून पुढे आपल्याला शिवाजी महाराजांवरच अभ्यास करावा लागणार, पण कशाचे काय , मी जसा जसा एक एक इयत्ता पुढे जात राहिलो तसे तसे छत्रपती मराठा आणि मावळे माझ्यापासून दूर होत गेले . पुढील इतिहासाची पुस्तके इंग्रज आणि मुसलमान या दोघांनीच व्यापून टाकली होती .
मला सतत इंग्रज आणि मुसलमान सत्ता याविषयीच शिकवले जात होते जसं काही मला पुढे जाऊन त्यांच्याकडे नांदायला जायचं आहे , विकृत आणि दळभद्री पाठ्यपुस्तक लेखकांनी महाराष्ट्रात राहून मला मराठ्यांना विसरून जाण्यास भाग पाडले , अर्थातच त्यांना मी यशस्वी होऊ दिले नाही . एक पान मराठ्यांचे तर दुसरीकडे 99 पानांवर फक्त इंग्रज आणि मुसलमान हे दोनच शब्द दिसायचे .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव कडेपर्यंत मला मुसलमान बादशहांच्या वंशावळी तोंडपाठ झाल्या होत्या , त्यांचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांची नावे मला कोणी झोपेत विचारली असती तर मी सांगितले असती , शाळेत असेपर्यंत जळी स्थळी काष्टी पाषाणी मला फक्त इंग्रज आणि मुसलमान हेच दिसायचे , माझं डोकं फुटून जाईल इतकी माहिती माझ्या डोक्यात इंग्रज आणि मुसलमान यांच्या बाबत कोंबली जात होती.
माझ्या सांगण्याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे , मी भारतात राहतो महाराष्ट्रीयन आहे मग मी इंग्रज आणि मुसलमानांचा इतिहास का म्हणून शिकायचा ? मुघल बाहेरून आले इंग्रज बाहेरून आले त्यांनी भारतीय जनतेवर जुलूम अत्याचार केले त्यांनी कसा भारतातील राज्याचा एकजुटीच्या अभावाचा फायदा घेतला कशाप्रकारे आपले स्वतःचे सिंहासन स्थिर केले , हिंदू जनतेला कशाप्रकारे जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले , हिंदू जनतेवर जिझिया कर लावला, हे ठीक होते पण काही पाठ्यपुस्तकांमध्ये चक्क त्यांचे गुण्या गोविंदाने वर्णन केले आहे , मुगल आणि इंग्रज उत्तम शासक होते , ते खूपच चांगले होते वगैरे वगैरे ... हा काय प्रकार?
मुसलमान राजांच्या विषयी आपण पुढच्या लेखात बोलूच , आज इंग्रजांची कुंडली पाहू.... जेथे विल्यम शेक्सपियर सारखा जगप्रसिद्ध नाटककार जन्माला त्या देशातील माणसे ही क्रूर राक्षसी अत्याचारी जुलमी असतात हे इंग्रजांनी भारतावर केलेल्या दीडशे वर्षांच्या राज्यकारभारातून सिद्ध केले , व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले , राज्यकर्ते नवे राक्षस बनले , निरापराध निशस्त्र जनतेवर या नराधमांनी अत्याचार केले , क्रूरपणे हत्या केल्या , जालियनवाला बाग हत्याकांड हा इंग्रजांच्या अत्याचाराचा कळस होता , भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाष चंद्र बोस हे जिवंत असते तर त्यांनी एकही इंग्रज जिवंतपणे भारताबाहेर जाऊ दिला नसता .
असे हे नराधम राक्षस इंग्रज 1947 ला भारत सोडून गेले पण जातानाही त्यांनी भारताचे फाळणी करून असंख्य भारतीय जनतेला बेघर केले लाखो लोकांना मृत्यूच्या जबड्यात ढकलले , भारताला इंग्रज नावाच्या राक्षसांनी सर्वात जास्त लुटले ,
क्रमशः ....
खरेच काय गरज आहे मला
ReplyDeleteकाहीच गरज नाही
Deleteहिंदू चा स्फूर्ती दायक इतिहास शिकवला गेला पाहिजे
ReplyDeleteबरोबर बोललात
Deleteमुसलमान आणि इंग्रज इतिहासजमा झाले त
ReplyDeleteएकदम बरोबर
Deleteसह्याद्री जिंकण्याची स्वप्न हे औरंगजेबचे स्वप्न च राहिले
Deleteइंग्रज आणि मुसलमानांचे बाप होते फक्त मराठे
ReplyDeleteसह्याद्री जिंकायला आलेला औरंगजेब सह्याद्री पासून लांबच राहिला
Deleteसह्याद्री च्या कडेकपरित घुसण्याची हिम्मत औरंगजेब मध्ये कधीच नव्हती
Delete