अपेक्षा

 नमस्कार मित्रांनो

मागच्या लेखात आपण वास्को-द-गामा याचे भारतातील आगमन इथपर्यंत आलो होतो ... पुढे

 तत्पूर्वी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते फार च गरजेची आहे , बंधू आणि भगिनींनो मागच्या लेखानमध्ये मी जे काही लिहिले आहे ते सर्व तुम्ही कुठे ना कुठे वाचले च आहे किंवा ऐकले ही असेल च मग मी सांगतो लिहितो त्यात नवे ते काय आहे ?? खूप प्रतिक्रिया याच स्वरूपाच्या आहेत, ज्यांनी या प्रतिक्रिया देऊन एक प्रश्न चिन्ह माझ्या समोर उभे केले आहे , हे संशिप्त उत्तर त्यांच्या करिता च आहे.

प्रिय वाचकहो मी एक साधा सरळ माणूस आहे , वरिष्ठानी सांगायचे जा रे हा हातोडा त्या झाडाला मार आणि मी तो मुकाट्याने मारून येणार अश्या पंथातला मी व्यक्ती... हा विचार माझ्या मनी सुद्धा येणार नाही कि हातोडा मारल्याने त्या झाडाला जखम तर होणार नाही ना ??  कि हातोडा का मारायचा ?? आजिबात नाही, आपल्याला आज्ञा मिळाली ना ती तंतोतंत पाळायची हा माझा शिरस्ता.

मित्रानो मी शाळेत एक स्कॉलर विद्यार्थी, इतिहास भूगोल माझे आवडते विषय , नागरिक शास्र सुद्धा.... घरच्या गरिबी मुळे जास्त शिकता ही आले नाही , चरितर्था करिता खाजगी क्षेत्रात काम करतो आहे , सावली मध्ये ऐ सी च्या थंड गार हवे मध्ये बसायचं नऊ तास एकाच ठिकाणी समाधान इतकेच... वाढत्या वया सोबत प्रगल्भता आली , हातात मोबाईल आला आणि त्या सोबत सोशल मीडिया आणि गुगल सुद्धा...आणि मित्रानो जिओ नेटवर्क चे प्लॅन असे आहेत कि तुम्ही वापरा किंवा नका वापरू नेट चा डेली बॅलन्स कायम तुमच्या सोबत असतो , हळू हळू हे मायाजाल उघडून पाहू लागलो नंतर व्हाट्सअप इंस्टग्राम सर्व कळायला समजायला लागले , वाचनाची आवड लहानपणापासून च होती.... मोबाईल वर चित्रपट पाहण्या पर्यंत मजल गेली त्याचा ही कंटाळा यायला लागला आणि मग विविध लेखकांची पुस्तके वाचायला सुरुवात झाली , कथा कादंबऱ्या विनोदी , चित्त थरारक प्रवास वर्णने किती तरी प्रकार ची पुस्तके आणि मग ओघाने इतिहास संबंधित पुस्तके सुद्धा कि जो माझा आवडता विषय...

मित्रानो इतिहास वाचता वाचता मला खूप विसंगती आढळून आल्या कि त्या आपल्या शालेय पुस्तकात कधी च नव्हत्या मला ज्या विसंगती आढळून आल्या त्या ची सत्य असतत्या मी तपासून ही पहिल्या आहेत , एका एका मुद्द्यावर मी अनेक लेखकांची मते वाचली , गुगल वर ती उपलब्ध आहेत , अर्थात ज्या बाजूने बहुमत आहे अशीच उत्तरे मी बरोबर मानली आहेत...

तुम्ही विचाराल कि मेलेले मुडदे काढून काय मिळणार आहे, बरोबर आहे , त्याने मला आणि तुम्हाला सुद्धा काही च मिळणार नाही पण मला प्रश्न इतकाच पडतो कि या मुद्द्यावर जाहीर संभाषण का होत नाही, संविधान आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य देते मग आपण आपल्या मनात जे आहे ते जाहीर पणे बोलून का दाखवू शकत नाही , मग त्या व्यक्ती स्वातंत्र्याला काय अर्थ ??

मनातली खद खद जाहीरपणे बोलता यावी यासाठीच हा लेखन प्रपंच , तुमच्या ही प्रतिक्रिया असतील आणि त्या असाव्यात ही माझी अपेक्षा आहे, या साठी मी कमेंट बॉक्स ओपन मोकळा च ठेवला आहे. चांगल्या सोबत वाईट सुद्धा असणारच हे मी गृहीत धरून च आहे...

चला ... मी तयार आहे तुम्ही पण तयार राहा , पुढील लेखनमधून आपण भेटत राहू ही अपेक्षा.... क्रमश  : 


Comments

  1. व्यक्ती स्वातंत्र्य आहे

    ReplyDelete
  2. बाबासाहेब आंबेडकर महान द्रष्टे होते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारताला स्वातंत्र्य कोणामुळे

इतिहासकार आणि मुघल

विकृत दळभद्री पाठ्यपुस्तक कार