Posts

Showing posts from August, 2023

भारताला स्वातंत्र्य कोणामुळे

 इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता एवढ्या मोठ्या साम्राज्याचे संस्थापक विस्तार करते इंग्रज काहीच कारण नसताना मोठ्या मनाने भारताला स्वातंत्र्य देऊन निघून गेले ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे अमेरिका फ्रान्स आणि रशिया यांच्या मदतीने ग्रेट ब्रिटन ने दुसरे जागतिक महायुद्ध जिंकले होते याचाच अर्थ इंग्रज तेव्हा यशाच्या शिखरावर होते , जागतिक महासत्ता म्हणून इंग्लंड ने त्यावेळी स्वतःची ओळख निर्माण केली होती, आणि एकाकी दोन वर्षातच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून ओळख असणाऱ्या भारताला त्यांनी स्वातंत्र्य दिले ही गोष्ट मनाला पटत नाही ,  1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा इंग्रज सैनिकांबरोबर भारतीय सैनिकांना ही दुसऱ्या महायुद्धात पाठवले गेले या गोष्टीला तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी कडाडून विरोध केला पण गांधीच्या मवाळ भूमिकेमुळे नेताजी आणि गांधी यांच्यात मतभेद निर्माण झाली परिणाम स्वरूप नेताजींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेस नेते आणि करमचंद गांधी  शांत बसले , कारण त्याकाळी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये  इंग्रजी सत्य ला कडाडून विरोध करणारे

इतिहासकार आणि मुघल

 मित्रांनो आपल्या शालेय पाठ्यपुस्तकला इतिहास म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्या पुरता च मर्यादित राहतो , प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक इतिहासाचे पाठ्यपुस्तके निर्माण करताना चे इतिहासकार एकतर मुगल खानदानातले असावेत किंवा तत्कालीन राज्यकर्ते तरी मुघल खानदानातले असावेत ,  भारत वर्षाचा इतिहास हा अतिशय वैभवशाली आणि सामर्थ्यशाली असाच आहे , पण शालेय पाठ्यपुस्तकात आपल्याला फक्त इंग्रज आणि मुगल यांचा इतिहास शिकवला जातो कारण आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचे लेखक हे दळभद्री होते , गुप्त मौर्य चालुक्य  देवगिरी कलिंगा यासारखे प्राचीन भारताची अनेक वैभवशाली आणि सामर्थ्यशाली साम्राज्य होती , चंद्रगुप्त मौर्य पृथ्वीराज चव्हाण सम्राट अशोक शिवाजी महाराज यांचा इतिहास हा निश्चितच भारतीय जनतेसाठी स्फूर्तीदायक आहे. पण आपल्या शालेय पाठ्यपुस्तक इतिहासकारांना यांचा विसर पडलेला दिसतो , किंवा जाणीवपूर्वक त्यांनी ते तसे केलेले आहे , आपण गुलामगिरी मध्ये च चांगले जगतो हेच या इतिहासकारांना सिद्ध करावयाची दिसते ,  स्फूर्तीदायक इतिहास शिकवण्याऐवजी आपले इतिहासकार आपल्याला गुलामगिरीने बरबटलेला इतिहास शिकवतात , भारत

नेताजी भारताचे पहिले पंतप्रधान

 तुम मुझे खून दो , मै तुम्हे आजादी दूंगा ,  हे वाक्य आज जरी ऐकले तरी रक्त सळसळले जाते, मित्रांनो मागच्या लेखात मी म्हटलं होतं की भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस होते , आजचा लेख त्याविषयीच आहे ,  ओरिसा राज्यातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात 23 जानेवारी 1897 मध्ये या महान देशभक्त स्वातंत्र्यसेनाणींचा जन्म झाला , ते आझाद हिंद सेनेचे संस्थापक होते , अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता , स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी सत्ता लोकमान्य टिळक यांच्या नंतर फक्त यांनाच घाबरत होती, नेताजी जहाल मताचे देशभक्त होते . इंग्रजांच्या जुलूमशाहीला त्यांनी कडाडून विरोध केला.  नेताजी असे त्यांना सर्वप्रथम 1942 च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी संबोधले , जर्मनी आणि जपान यांच्या मदतीने त्यांनी आजच हिंद सेनेची स्थापना केली , त्यानंतर मी 1943 मध्ये अंदमान आणि निकोबार या बेटावर भारताच्या तात्पुरत्या सरकारची घोषणा केली आणि भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून राष्ट्रध्वजाला सलामी दिली होती. या तात्पुरत्या सरकारला तेव्हाच्या आघाडीच्या देशांनी मान्यता दिली होती ,

विकृत दळभद्री पाठ्यपुस्तक कार

 मी इयत्ता चौथी मध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे मुखपृष्ठ असणारे इतिहासाचे पुस्तक पहिल्यांदा हातात पडले मला ते चित्र फार आवडायचे , वाटायचे चला आता इथून पुढे आपल्याला शिवाजी महाराजांवरच अभ्यास करावा लागणार, पण कशाचे काय , मी जसा जसा एक एक इयत्ता पुढे जात राहिलो तसे तसे छत्रपती मराठा आणि मावळे माझ्यापासून दूर होत गेले . पुढील इतिहासाची पुस्तके इंग्रज आणि मुसलमान या दोघांनीच व्यापून टाकली होती .  मला सतत इंग्रज आणि मुसलमान सत्ता याविषयीच शिकवले जात होते जसं काही मला पुढे जाऊन त्यांच्याकडे  नांदायला जायचं आहे , विकृत आणि दळभद्री पाठ्यपुस्तक लेखकांनी महाराष्ट्रात राहून मला मराठ्यांना विसरून जाण्यास भाग पाडले , अर्थातच त्यांना मी यशस्वी होऊ दिले नाही . एक पान मराठ्यांचे तर दुसरीकडे 99 पानांवर फक्त इंग्रज आणि मुसलमान हे दोनच शब्द दिसायचे .  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव कडेपर्यंत मला मुसलमान बादशहांच्या वंशावळी तोंडपाठ झाल्या होत्या , त्यांचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांची नावे मला कोणी झोपेत विचारली असती तर मी सांगितले असती , शाळेत असेपर्यंत जळी स्थळी काष्टी पाषाणी मला फक्त

एक भयानक वास्तव

 1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील कालिकत  बंदराजवळील एका छोट्या खेड्यात आला . त्याने स्थानिक राजा श्री सामूरी त्यांच्याकडे कालिकत बंदरात वखार उभारण्याची परवानगी मिळवली आणि व्यापार सुरू केला , त्यानंतर दोन वर्षांनी कोचीन बंदरात देखील वखार सुरू करून व्यापाराची परवानगी मिळवली , या दोन वर्षात दरम्यान वास्को-द-गामाने अरबी आणि इराणी व्यापाऱ्यांना हाकलून देऊन स्वतःची मक्तेदारी निर्माण केली , याच दरम्यान गामा आणि त्याच्या सहकाऱ्यांना भारतातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात आली होती,  येथील राज्यकर्त्यांमध्ये आपापसात शत्रुत्व आणि एक जुटीचा अभाव होता , स्थिर झाल्यानंतर गामा ने सामूरी राजाच्या सैन्याला कोचीन आणि कालिकत बंदरामधून हाकलून लावले आणि स्वतः कोचिंग बंदरात किल्ला बांधला तोपर्यंत पोर्तुगाल राजा कडून वास्को द गामा याच्या  मदतीसाठी आरमारी सैन्य पाठवले होते.  पोर्तुगीज राजाचा प्रतिनिधी फ्रँसीस द आलमेयदा हा 1503 मध्ये सैन्या आणि आरमार घेऊन पहिला व्हाईसरॉय म्हणून भारतात आला , यादरम्यान पोर्तुगीज सैन्याने भारतातील किलवा अंजदीव कोचीन कंनोर या बंदरामध्ये किल्ले बा

अपेक्षा

 नमस्कार मित्रांनो मागच्या लेखात आपण वास्को-द-गामा याचे भारतातील आगमन इथपर्यंत आलो होतो ... पुढे  तत्पूर्वी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते फार च गरजेची आहे , बंधू आणि भगिनींनो मागच्या लेखानमध्ये मी जे काही लिहिले आहे ते सर्व तुम्ही कुठे ना कुठे वाचले च आहे किंवा ऐकले ही असेल च मग मी सांगतो लिहितो त्यात नवे ते काय आहे ?? खूप प्रतिक्रिया याच स्वरूपाच्या आहेत, ज्यांनी या प्रतिक्रिया देऊन एक प्रश्न चिन्ह माझ्या समोर उभे केले आहे , हे संशिप्त उत्तर त्यांच्या करिता च आहे. प्रिय वाचकहो मी एक साधा सरळ माणूस आहे , वरिष्ठानी सांगायचे जा रे हा हातोडा त्या झाडाला मार आणि मी तो मुकाट्याने मारून येणार अश्या पंथातला मी व्यक्ती... हा विचार माझ्या मनी सुद्धा येणार नाही कि हातोडा मारल्याने त्या झाडाला जखम तर होणार नाही ना ??  कि हातोडा का मारायचा ?? आजिबात नाही, आपल्याला आज्ञा मिळाली ना ती तंतोतंत पाळायची हा माझा शिरस्ता. मित्रानो मी शाळेत एक स्कॉलर विद्यार्थी, इतिहास भूगोल माझे आवडते विषय , नागरिक शास्र सुद्धा.... घरच्या गरिबी मुळे जास्त शिकता ही आले नाही , चरितर्था करिता खाजगी क्षेत्रात काम करतो आहे , सा

गरम मसाला ते वास्को द गामा

आठव्या शतकाच्या सुमारास अरबी राज्यकर्त्यांच्या नजरा हिंदुस्तान कडे होत्या. खास करून पहिल्यांदा मोहम्मद कासिम याने सिंध प्रांतावर ताबा मिळवला, त्यानंतर मोहम्मद घोरी त्याने अकराव्या  शतकाच्या उत्तरार्धात हिंदुस्तान वर अनेक आक्रमणे करून उत्तर पश्चिम हिंदुस्थानात स्वतःची सत्ता स्थापन केली, त्याला पार्श्वभूमी होती ती मोहम्मद गजनी याच्या हिंदुस्तान वर केलेल्या सतरा स्वाऱ्यांची, या सतरा स्वार्यांनी उत्तर हिंदुस्तान मधील राज्यसत्ता खिळाखील्या झाल्या होत्या कमकुवत झाल्या होत्या, याचाच फायदा मोहम्मद शहा घोरी ने घेतला होता. प्रारंभी त्याने अंमलदार नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने स्वतःला सुलतान म्हणून जाहीर केले आणि आपला राज्य विस्तार करून दिल्लीत एक स्थिर शासन स्थापन केले.  अरबी देशांमध्ये व्यापार हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता, मजबूत आणि स्थिर सत्ता जनतेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात , कुतूबुद्दीन ऐबक च्या काळात हिंदुस्थानचे अरबी देशांसोबत व्यापार जोरात चालू होता , त्यामध्ये मुख्यतः मसाल्याचे पदार्थ होते,  अरबी सुलतानांचा युरोपियन देशांसोबत पूर्वीपासूनच व्यापार चालत असे , हिंदुस्तानी मसा

आदी आदिम आदिवासी

 आदिवासी.... आखिल विश्वात दुर्गम भागात एकच जमाती नांदते ती म्हणजे आदिवासी. मी एक आदिवासी च बोलतोय.हिमयुग अशमयुग मी जवळून पहिले अनुभवले, मुळातच मी निसर्गप्रेमी असल्याने निसर्गाच्या या अवस्था मी आत्मीयतेने जगलो , यामुळेच जबरदस्त सहनशीलता हा गुण माझ्यात आला आणि पुढचं जगणे सुकर झाले. आजच्या प्रगत आधुनिक मानवाच्या मुळाशी मीच आहे, आजचा विकसित मनुष्य जाणीव पूर्वक ही गोष्ट विसरू पाहत आहे. ही एक दुःखादायक सल मनाला बोचते नेहमीच. माझा संपन्न वारसा परंपरा या फक्त माझ्या पुरत्याच सीमित आहेत का, बारमाही वाहणाऱ्या नद्या घनदाट वनराई मिरवणारे डोंगर दऱ्या हा माझा नैसर्गिक अधिवास विलुप्त होण्याच्या मार्गांवर आहे. ज्या निसर्गाच्या कुशीत माझं संगोपन झालं विस्तार झाला त्या निसर्गाला ओरबसूनच आजचा मानव प्रगती करतो आहे, यालाच प्रगती म्हणायची का, कुऱ्हाडी चा दांडा गोतास काळ ही म्हण सार्थ केली आजच्या आधुनिक मानवाने. लाज लज्जा शरम खुन्टीला टांगून ठेवली आहे. ज्या निसर्गाच्या कृपेनें मनुष्य येथवर पोहोचला आज त्याच निसर्गाच्या मुळाशी घाव घातला जातोय. लक्षावधी वर्षे या पृथी तलावर राज्य करणारे डायनासोर सुद्धा इतके राक्